भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंसाचिया घरा आला नारदमुनी । एकांतीं बैसोनी सांगतसे

kansachiya ghara ala naradamuni | ekantin baisoni sangatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कंसाचिया घरा आला नारदमुनी । एकांतीं बैसोनी सांगतसे ॥१॥ सातवा जो गर्भ जिराला ह्मणती । रोहिणी प्रस-वती बळीराम ॥२॥ आठवा जो पुत्र देवकीसी झाला । वसुदेवें नेला नंदाघरीं ॥३॥ यशोदेची कन्या घेऊनियां येत । गेली आका-शांत मारीतां जे ॥४॥ तुझिया मानसीं अशंका येईल । होते रक्ष-पाळ माझे तेथें ॥५॥ ईश्वराची माव न कळे कोणाला । कळलें हें मजला त्याच्याकृपें ॥६॥ घेऊनियां शस्त्र उठला त्वरीत । करितों मी अंत वसुदेवावा ॥७॥ तयेवेळीं ह्मणे ब्रह्मयाचा सूत । ऐक तुज मात सांगतों मी ॥८॥ आधीं मारी पुत्र तुझे जे कां वैरी । असे तुझ्याघरीं मग यासी ॥९॥ सांगोनियां ऐसें शांतविलें त्यासी । गेला गोकुळासी नामा ह्मणे ॥१०॥