भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांरे तूं शिणतोसि घरदार बंधनें । वांयांचि व्यसनें आणितोसी

kanre tun shinatosi gharadar bandhanen | vanyanchi vyasanen anitosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कांरे तूं शिणतोसि घरदार बंधनें । वांयांचि व्यसनें आणितोसी ॥१॥ भजें यादवराया लागें त्याच्या पायां । आणिक उपायां करूं नको ॥२॥ सर्वभावें हरिभजन तूं करी । भक्ति दे पुढारी तारीक सत्य ॥३॥ नामा ह्मणे दया मांडी सोडीं माया । भजन लवलाह्या हरीचें करीं ॥४॥