भजनी मालिका
← भजनांकडे परत

कान्हां तूं आजि कां झालासि बैमान ॥ध्रु

kanhan tun aji kan jhalasi baiman ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कान्हां तूं आजि कां झालासि बैमान ॥ध्रु०॥ तूं तो आमुची गडी । म्हणोनि मी केली खोडी । घालूं हुंबर यमुनेची मोडूं मान ॥१॥ होसी तूं आमुचा बळी । म्हणोनि म्यां केली कळी । तेथें कशाचा काय गुमान ॥२॥ जरी तूं होसी सखा । होऊंदे जाला वाखा । चल रूपवती घरीं घेऊं मान ॥३॥ समजूनियां देव । येक नामा नामदेव । जाले ते हरपले या द्वैत भान ॥४॥