भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां करिसी हव्यास इंद्रियांचा सोस । वायां कासावीत कोण्या काजें

kan karisi havyas indriyancha sos | vayan kasavit konya kajen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कां करिसी हव्यास इंद्रियांचा सोस । वायां कासावीत कोण्या काजें ॥१॥ सर्व ही लटिकें मोहबंधन । सत्य हें निधान विठठल एक ॥२॥ उगवेल प्रंपच सर्व हें आहाचें । रामकृष्ण वाचे बांध जिव्हें ॥३॥ नामा म्हणे करणी करावी पै ऐसी । जेणें त्या विठठलासी पाविजेसा ॥४॥