भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां हो मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें चित्त तुझें

kan ho mokalilen kavana niravilen | kathin kaisen jalen chitta tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कां हो मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें चित्त तुझें ॥१॥ करुणाकल्लोळणी अमृत संजीवनी । चिंतल्या निर्वाणीं पावें वेगीं ॥२॥ अपराधी अनाथ जरी जालें अमंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥३॥ नामा म्हणे विठ्ठले आलों मी तुजपाशीं । केधवां भेटसी अनाथनाथा ॥४॥