भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गे निष्ठुर झालीसी । मुक्या बाळातें सांडिसी

kan ge nishthur jhalisi | mukya balaten sandisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कां गे निष्ठुर झालीसी । मुक्या बाळातें सांडिसी ॥१॥ तुज वांचोनिया माये । जीव माझा जावों पाहे ॥२॥ मी वत्स माझी माय । नये आतां करूं काय ॥३॥ प्राण धरियेला कंठीं । जनी म्हणे देईं भेटी ॥४॥