भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गा न येसी विठ्ठला । ऐसा कोण दोष मला

kan ga na yesi viththala | aisa kon dosh mala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कां गा न येसी विठ्ठला । ऐसा कोण दोष मला ॥१॥ मायबाप तूंचि धनी । मला सांभाळीं निर्वाणीं ॥२॥ त्वां बा उद्धरिले थोर । तेथें किती मी पामर ॥३॥ दीनानाथा दीनबंधू । जनी म्हणे कृपासिंधू ॥४॥