भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्याणींचा सिंपी हरिभक्त गोमा । त्याची कांता उमा नरहरिभजनीं

kalyanincha simpi haribhakta goma | tyachi kanta uma naraharibhajanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कल्याणींचा सिंपी हरिभक्त गोमा । त्याची कांता उमा नरहरिभजनीं ॥१॥ सरिता सुकृताची त्या पोटीं उत्पन्न । जाली संबोधन गोणाबाई ॥२॥ गोणाई दामासेठी जालें पाणिग्रहण । संसारीं असोन नरसी गांवीं ॥३॥ गोत्र संज्ञा ऐका पूर्वजांची सहज । गाधिज भारद्वाज दोनीं कुळें ॥४॥ आऊबाई कन्या जाली गोणाईसी । पुढें देवा नवसी पुत्रासाठीं ॥५॥ नामा म्हणे होतें विठोबाचे मनीं । तेंचि नित्य जननी नवस करी ॥६॥