भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्मष हरती जयाचेनि नामें । तें विसरोनि काय करावें

kalmash harati jayacheni namen | ten visaroni kay karaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कल्मष हरती जयाचेनि नामें । तें विसरोनि काय करावें ॥१॥ संसारतारक विसांवा हरि । गर्भवास चुकवी तो मुरारि ॥२॥ बाह्या उभारोनि घेतां राम नामा । वैकुंठींचा देव केशव परमात्मा ॥३॥