भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यासी विन्मुख संसार । तो मोक्षाचा विचार

jyasi vinmukh sansar | to mokshacha vichar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्यासी विन्मुख संसार । तो मोक्षाचा विचार ॥१॥ आम्ही पंढरीचे लाठे । नवजो वैकुंठीचे वाटे ॥२॥ सांडोनी पंढरीची वारी । मोक्ष मागतो भिकारी ॥३॥ जन्मोजन्मींचा आळसी । तो मुक्तीतें अभिलाषी ॥४॥ ताट ओगरिलें निकें । सांडोनी कोण जाय भिके ॥५॥ जो कां नेणे नामगोडी । तो मुक्तीतें चरफडी ॥६॥ नामा म्हणे विष्णुदासां । झणीं भ्याला गर्भवासा ॥७॥