भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी । पाहे आपणासी शोधूनियां

jyache nam ghesi tochi tun ahesi | pahe apanasi shodhuniyan

रचनाकार: संत रामदास · अभंग
ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी । पाहे आपणासी शोधूनियां ।। शोधितां शोधितां मीपणचि नाहीं । मीपणाचें पाही मूळ बरें ।। मूळ बरें पहा नसोनियां राहा ।आहां तैसें आहां सर्वगत ।। सर्वगत आत्मा तोचि तूं परमात्मा । दास अहं आत्मा सांगतसे ।।