भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी

jyacha sakha hari | tyavari vishva krupa kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥ उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें ॥२॥ तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥ आंगा आपुले ओढोनी । त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥ ऐसा अंकित भक्तांसी । म्हणे नामयाची दासी ॥५॥