भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोड झालीरे शिवासी । भ्रांत फिटली जिवाची

jod jhalire shivasi | bhrant phitali jivachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जोड झालीरे शिवासी । भ्रांत फिटली जिवाची ॥१॥ आनंदची आनंदाला । आनंद बोधचि बोधला ॥२॥ आनंदाची लहरी उठी । ब्रम्हानंद गिळिला पोटीं ॥३॥ एक पण जेथें पाहीं । तेथें विज्ञप्ति उरली नाहीं ॥४॥ ऐसी सद्रुरुची करणी । दासी जनी विठ्ठल चरणीं ॥५॥