भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाला अस्तमान तेथेंचि रहाती । ऐकें परीक्षिती अद्‍भुत हें

jhala astaman tethenchi rahati | aiken parikshiti ad‍bhut hen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
झाला अस्तमान तेथेंचि रहाती । ऐकें परीक्षिती अद्‍भुत हें ॥१॥ निद्रेनें व्यापिलें शौनकारे सर्वां । लागला वणवा तया स्थानीं ॥२॥ गायी पाळताती पक्षी उडताती । पिलीं पडताती कृष्णापुढें ॥३॥ हाहा:कार झाला धांव धांव कृष्णा । वांचवीं रे प्राणा सकळांच्या ॥४॥ तुझीं आह्मी बाळें वाचवींरे आह्मां । धांव धांव रामा ह्मणताती ॥५॥ आक्रोशें रडती मारिताती हांका । वैकुं-ठनायका रक्षीं आह्मां ॥६॥ दीनाच दयाळ मनाचा कोवळा । घाली अभिज्वाळा मुखामाजी ॥७॥ होतां प्रात: काळ सकळ चालिले नामा ह्मणे आले गोकुळांशी ॥८॥