भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाला अभिमान धन्य आम्हीं आतां । लक्षुमीच्या कांता भोगीतसों

jhala abhiman dhanya amhin atan | lakshumichya kanta bhogitason

रचनाकार: संत नामदेव · अभंग
झाला अभिमान धन्य आम्हीं आतां । लक्षुमीच्या कांता भोगीतसों ॥१॥ गुप्त झाला तेव्हां वैकुंठनायक । करिताती शोक सकळीक ॥२॥ निघाल्या तेथूनि फिरताती वनें । यशोदेचें तान्हें धुंडावया ॥३॥ वृक्ष आदि पक्षी पुसती तयांसी । तुम्हीं ह्लषि-केशी देखियेला ॥४॥ मृगासी पुसती देखीयेला डोळां । सांगारे सां-वळा कोणी तरी ॥५॥ आम्हांवरी तुम्हीं काय रे कोपतां । सांगा रे भगवंता पुसतसों ॥६॥ कुरवंडी करू सकळांचे प्राण । देऊं त्या भू-षण अंगावरील ॥७॥ नामा म्हणे जेथें असे अभिमान । तेथें नारा-यण नाहीं नाहीं ॥८॥