भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयजयकारें टाळी पिटली सकळां । घातियेली शिळा समाधिसी

jayajayakaren tali pitali sakalan | ghatiyeli shila samadhisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जयजयकारें टाळी पिटली सकळां । घातियेली शिळा समाधिसी ॥१॥ निवृत्तिमुक्ताईनें घातियेली घोन । करितो समाधान पांडुरंग ॥२॥ सोपान वटेश्वर सुखधामीं शेजा । करिताती पूजा समाधीची ॥३॥ खेद दुःख जालें अवघ्या साधूजनाम । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥४॥ निवृत्तिमुक्ताईनें वंदिली समाधि । देहभान शुद्धि हारपली ॥५॥ नामा म्हणे देवा उठा अवघेजण । करूं आचमन भोगावतीं ॥६॥