भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाखाई जोखाई उदंड दैवतें । वाउगेंचि व्यर्थ श्रमतोसी

jakhai jokhai udand daivaten | vaugenchi vyartha shramatosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाखाई जोखाई उदंड दैवतें । वाउगेंचि व्यर्थ श्रमतोसी ॥१॥ अंतकाळीं तुज सोडविना कोणी । एक्या चक्र-पाणी वांचोनियां ॥२॥ मागें थोर थोर कोणें केलें तप । उद्धरीलें अमूप नारायणें ॥३॥ नामा म्हणे ऐसे बहु झाले भांड । न उच्चारी लंड नाम वाचे ॥४॥