भजनी मालिका
← भजनांकडे परत

इतुकें मागतसें तुज । वनीं जन्म देईं मज

ituken magatasen tuj | vanin janma dein maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
इतुकें मागतसें तुज । वनीं जन्म देईं मज ॥१॥ सुखें करूनी राहीन । तुझे पाहीन चरण ॥२॥ बहुत शीणलों । आतां तुजपाशीं आलों ॥३॥ न करीं अव्हेर । दास तुझा मी किंकर ॥४॥ ब्रह्मा येतो काकुळती । नामा म्हणे देवाप्रती ॥५॥