भजनी मालिका
← भजनांकडे परत

इतुकें देखोनि चरणीं घाली मिठी । सांठवला सृष्टी अवघाअ देव

ituken dekhoni charanin ghali mithi | santhavala srushti avaghaa dev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
इतुकें देखोनि चरणीं घाली मिठी । सांठवला सृष्टी अवघाअ देव ॥१॥ तिहीं त्रिभुवनीं आपण व्यापुनी । आनंदें कोंडोनि राहियेला ॥२॥ श्रीगुरुचे पाय जीवें न विसंबत । मनोवृत्तिसहित ओंवाळिलें ॥३॥ डोळियांचे डोळे उघडिलें जेणें । आनंदाचें लेणें लेवविलें ॥४॥ जन्ममरणांचें तोडिले सांकडें । कैवल्यचि पुढें दावियेलें ॥५॥ कैवल्याचा गाभा विटेवरी उभा । दिसे दिव्या शोभा पांडुरंग ॥६॥ नामा म्हणे माझी भक्ति हे माउली । कृपेची साउली केली मज ॥७॥