भजनी मालिका
← भजनांकडे परत

हुंबरीच्या मिषें हुतुतु खेळती । गडयांशीं श्रीपति सर्वकाळ

humbarichya mishen hututu khelati | gadayanshin shripati sarvakal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हुंबरीच्या मिषें हुतुतु खेळती । गडयांशीं श्रीपति सर्वकाळ ॥१॥ कळंबाचे झाडाखालीं कुंकमाचे सदे । गोपाळा पवाडे दावीतसे ॥२॥ काय काय सागें घेसी नानापरी । गोपिकांचे घरीं काम सारीं ॥३॥ नामा ह्मणे ऐसी अगाध जे कीर्ति । भोळ्या भक्तांप्रति दावीतसे ॥४॥