भजनी मालिका
← भजनांकडे परत

ह्मणसी बिभिषण शाहणा । परि तो महा मूर्ख जाणा

hmanasi bibhishan shahana | pari to maha murkha jana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ह्मणसी बिभिषण शाहणा । परि तो महा मूर्ख जाणा ॥१॥ काय तो रामासी भेटला । भेटून रामचि नाहीं झाला ॥२॥ राम दृष्टी देखतांची । पदवी न घेववेचि त्याची ॥३॥ कोण हित केलें तेणें । राम न कळी चिंतनें ॥४॥ जरी तो झाला लंकापती । नाश पावेल कल्पांतीं ॥५॥ नामया स्वामी तें जाणोन । अवघा रामचि होईन ॥६॥