भजनी मालिका
← भजनांकडे परत

हिंडतां श्रमलों बहु श्रम झाला । अजूनि माझी तुला करुणा नये

hindatan shramalon bahu shram jhala | ajuni majhi tula karuna naye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हिंडतां श्रमलों बहु श्रम झाला । अजूनि माझी तुला करुणा नये ॥१॥ मज काय देतां होईल तुझें उणें । किती होसी कृपण पांडुरंगा ॥२॥ घेउनी धरणें बैसलों महाद्वारीं । झालों पैं भिकारी पंढरीचा ॥३॥ विठा म्हणे देवा माझें मज देया । लौकिक कां वांयां करितोसी ॥४॥