भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि आम्हां श्रेष्ठ बोलिले परनिष्ठ । असतां दुर्घट परी सेव्य

henchi amhan shreshtha bolile paranishtha | asatan durghat pari sevya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हेंचि आम्हां श्रेष्ठ बोलिले परनिष्ठ । असतां दुर्घट परी सेव्य ॥१॥ पांडवांचें कुळ शोधितां निर्मळ । कुंड जार गोळ बुद्धिकांसी ॥२॥ भक्ति हे सरती जाति न सरती । ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य ॥३॥ दुर्वास वसिष्ठ अगस्ति गौतम । हे ऋषि उत्तम कुळींचे कैसे ॥४॥ व्यास आणि वाल्मिक कोण कुळ तयांचें । तैसेंचि आमुचें सोपान म्हणे ॥५॥