भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें गे आयुष्य हातोहातीं गेलें । आंगीं आदळलें जन्म-मरण

hen ge ayushya hatohatin gelen | angin adalalen janma-maran

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हें गे आयुष्य हातोहातीं गेलें । आंगीं आदळलें जन्म-मरण ॥१॥ कांरे निजसुरा दैवहत मना । आपुली सूचना न करिसी ॥२॥ कांरे तुज भ्रांति पडलीसे मूढा । वेढी चहूंकडा काळ सैन्य ॥३॥ नानारोगें तुझी काया वेधियेली । नरकाचीं भरलीं नवही द्वारें ॥४॥ पाळलीं पोशिलीं आप्त माझीं सखीं । अंतीं तुज पारखी होती जाण ॥५॥ नामा ह्मणे तुज ह्मणे तुज येतों लोटांगण । तारील नारायण भरंशानें ॥६॥