भजनी मालिका
← भजनांकडे परत

हवा हवा ह्मणताती श्रुति । परि त्या नेणती भुललीया

hava hava hmanatati shruti | pari tya nenati bhulaliya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हवा हवा ह्मणताती श्रुति । परि त्या नेणती भुललीया ॥१॥ तुझिया रूपा नेणती अगा कमळापती । बाळक म्हणती गौळियाचें ॥२॥ विष्णुदास नामयानें दावियेल्या खुणा । पंढरीचा राणी श्रीविठ्ठल ॥३॥