भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाटीं जायाचि तांतडी । नामा होता पैल थडी

hatin jayachi tantadi | nama hota pail thadi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हाटीं जायाचि तांतडी । नामा होता पैल थडी ॥१॥ म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥ जनी धांवा चालली । मागें विठ्ठल माउली ॥३॥