भजनी मालिका
← भजनांकडे परत

हस्तीच्या चरणावरी बैसे माशी । नमन तयासी करावया

hastichya charanavari baise mashi | naman tayasi karavaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हस्तीच्या चरणावरी बैसे माशी । नमन तयासी करावया ॥१॥ तैसें कायसें मी केवढें वापुडें । लागे कोणीकडे देवराया ॥२॥ नामा म्हणे तैसें मी एक दुबळें । चरणावेगळें करूं नको ॥३॥