भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीविण जिणें व्यर्थचि संसारीं । जग अलंकारी मिरवीत

harivin jinen vyarthachi sansarin | jag alankari miravit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरीविण जिणें व्यर्थचि संसारीं । जग अलंकारी मिरवीत ॥१॥ देवाविण शब्द लटकें करणें । भांडा रंजविणें सभे-माजी ॥२॥ आचार करणेम देवावीन जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥३॥ नामा म्हणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभागी तो ॥४॥