भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिनामीं उदास तो पतित निष्ठुर । तया यमकिंकर गांजितील

harinamin udas to patit nishthur | taya yamakinkar ganjitil

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिनामीं उदास तो पतित निष्ठुर । तया यमकिंकर गांजितील ॥१॥ तोचि हरिचा दासु नामीं । ज्या विश्वासु । तया गर्भवासु नाहीं नाहीं ॥२॥ मार्ग सांडोनियां आडमार्गें जाती । ते व्याघ्रा वरपडे होती क्षणामाजी ॥३॥ नामा म्हणे जिंहीं नामीं आ-ळस केला । तो येवोनि गेला व्यर्थ एक ॥४॥