भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीनाम गातां पवित्र । सेविती हरिहर ब्रह्मादिक

harinam gatan pavitra | seviti harihar brahmadik

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरीनाम गातां पवित्र । सेविती हरिहर ब्रह्मादिक ॥१॥ नाम तारी नाम साहाकारी । नामें उच्चारी रुपें तुझीं ॥२॥ ऐसीं अनंत नामें तुझीं न वर्णवती देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥३॥