भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिभक्त म्हणविणें हरिदर्शना नाहीं जाणें । बोलतां लजिरवाणें अहोजी देवा

haribhakta mhanavinen haridarshana nahin janen | bolatan lajiravanen ahoji deva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिभक्त म्हणविणें हरिदर्शना नाहीं जाणें । बोलतां लजिरवाणें अहोजी देवा ॥१॥ पतिव्रता म्हणविणें आणि परपुरुषीं विचारणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥२॥ क्षत्रिय म्हण-विणें आअणि पाठिशीं घाय साहणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥३॥ पितृभक्त म्हणविणें आणि पितृआज्ञा न करणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥४॥ ऐसे भक्त किती गेले अधोगति । नामा ह्मणे श्रीपति दास तुझा ॥४॥