भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरणी सांगे कांहीं कर्मविपाकासी । ऐशा ऐशा दोषीं ऐसे होती

harani sange kanhin karmavipakasi | aisha aisha doshin aise hoti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरणी सांगे कांहीं कर्मविपाकासी । ऐशा ऐशा दोषीं ऐसे होती ॥१॥ ठकवूनियां आह्मीं तुज जाऊं जरी । अंधतमाभि-तरीं वास पावों ॥२॥ गुरु स्वामी द्रोही विश्वासघातकी । तयास तो नरकीं वास सदा ॥३॥ परद्रोही परनिंदेसी रतला । तो होय कावळा जन्मोजन्मीं ॥४॥ पंक्तिभेदकेचीं मरतील पोरें । किंवा पती मरे बाळपणीं ॥५॥ सदासर्वकाळ दुष्ट कमीं रत । शूकरादि होत नीच योनी ॥६॥ अतीत अभ्यागत पूजा नाहीं ज्याला । घूस सर्प बिळामाजी होती ॥७॥ नामा ह्मणे केलें तैसें तें भोगावें । सावधान व्हावें जाणत्यांनीं ॥८॥