भजनी मालिका
← भजनांकडे परत

हांसोनि सोपानें खुणाविल्या खुणा । नामदेवा पाहुणा आला असे

hansoni sopanen khunavilya khuna | namadeva pahuna ala ase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हांसोनि सोपानें खुणाविल्या खुणा । नामदेवा पाहुणा आला असे ॥१॥ तयासी हो पाक पाहिजे पवित्र । भाजलें कीं कोरें कळों नेदी ॥२॥ मुक्तिकेचे पाराखी तुम्ही आहां देवा । भाजुनि जीवा शिवा ब्रह्म करा ॥३॥ आनंदें डुल्लती करावरी कर । नेणों राहिलें कोरें कोण्या गुणें ॥४॥ निर्गुणापासोनी सगुणाची संगती । नाहीं स्वरूपस्थिति अंगा आली ॥५॥ म्हणे मुक्ताबाई हेरोनियां हेरा । हिरा किंवा गारा नेणों बापा ॥६॥