भजनी मालिका
← भजनांकडे परत

हांसोनी पंढरिनाथ पाहे नाम्याकडे । म्हणे नवल केवढें भाग्य तुझें

hansoni pandharinath pahe namyakade | mhane naval kevadhen bhagya tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हांसोनी पंढरिनाथ पाहे नाम्याकडे । म्हणे नवल केवढें भाग्य तुझें ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ति ज्ञानेश्वर । करीतसे आदर संगतीचा ॥२॥ ऐसें भाग्य जेणें सर्वस्वें साधावें । तरीच जन्मा यावें विष्णुदासा ॥३॥ जावें स्वस्ति क्षेम यावें शीघ्रवत । करावें स्वहित कळेल तैसें ॥४॥ सर्वभावें आमचा विसरु न पडावा । लोभ असों द्यावा मजवरी ॥५॥ परियेसीं ज्ञानराजा बोले जगजीवनु । तूं तंव सर्वज्ञु सुखमूर्ति ॥६॥ परि एक मागणें आहे तुजप्रती । आठवण चित्तीं असो द्यावी ॥७॥ हें कृपेचेम पोसणें माझें आवडतें । क्षण जीवापरतें न करीं कदा ॥८॥ परी तुवाम सांकडे घातलें सर्वथा । दाटलें अवस्था ह्रदय माझें ॥९॥ आरुष साबडें नामें माझें वेडें । मार्गीं मागें पुढें सांभाळावेम ॥१०॥ ताहान भूक तुवां जाणावी जीवींची । मज चिंता याची थोर वाटे ॥११॥ मग नामयाचा हातु धरोनी श्रीपती । देतु अस हातीं ज्ञानदेवा ॥१२॥ रानीं वनीं जनीं विसंबसी झणीं । धाडितों देखोनी आर्त तुझें ॥१३॥ चरणीं ठेवुनी माथा निघते जाले दोघे । आले चंद्रभागे केलीं स्नानें ॥१४॥ पुंडलिकाचे चरण वंदूनियां माथा । उतरले भीमा पैल तीरीं ॥१५॥