भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरूच्या वचनें होईल पैं ज्ञान । न कळे प्रेम खूण विठोबाची

guruchya vachanen hoil pain dnyan | na kale prem khun vithobachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गुरूच्या वचनें होईल पैं ज्ञान । न कळे प्रेम खूण विठोबाची ॥१॥ वेदीं हें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैस प्रेम भाव ॥२॥ साधकासी सिद्धि होईल पैं प्राप्ति । न कळे निरूति प्रेम खूण ॥३॥ नामा म्हणे सोडा जाणीवेचा सीण । संतांची हे खून जाणे संत ॥४॥