भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुंडालिल्या जटा तोचि माथा केटा । गोजिरा गोमटा रामचंद्र

gundalilya jata tochi matha keta | gojira gomata ramachandra

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गुंडालिल्या जटा तोचि माथा केटा । गोजिरा गोमटा रामचंद्र ॥१॥ वैकुंठींचा राजा म्हणवितो योगी । दावावया जगीं योग करी ॥२॥ आकर्ण लोचन हातीं चापबाण । वल्कलें भूषणें नेसोनियां ॥३॥ पितृवचनालागीं मानोनि साचारी । झाला पादचारी वनीं हिंडे ॥४॥ देवंचिया काजीं ठेवोनियां निज । सर्वांपरी सज्ज झाला अंगें ॥५॥ नामा म्हणे त्याचें न कळे कौतुक । आपु-लिया सुख वाढावया ॥६॥