भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुण दोष माझे पाहों नको आतां । तारिसी अनंता मज आतां

gun dosh majhe pahon nako atan | tarisi ananta maj atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गुण दोष माझे पाहों नको आतां । तारिसी अनंता मज आतां ॥१॥ अगाध महिमा काय वानूं हरी । गोकुळाभीतरीं गाई राखी ॥२॥ अंबऋषीसाठीं जन्म सोशियले । महत्त्वाचे केले हूड स्वयें ॥३॥ नामा म्हणे तुझे नामाचेनि बळ । प्रसादें केवळ लाधलों मी ॥४॥