भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोसावीपणाचा दाखविती वेष । नाहीं निदिध्यास हरिनामीं

gosavipanacha dakhaviti vesh | nahin nididhyas harinamin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोसावीपणाचा दाखविती वेष । नाहीं निदिध्यास हरिनामीं ॥१॥ वरी वरी आर्त दाविती झगमग । अंतरीं तो संग विषयाचा ॥२॥ व्यर्थ लोकांपुढें हालविती मान । विटंबन केली संसाराची ॥३॥ नामा ह्मणे मन गुंतेल पांडुरंगा । आतां ऐशा सांगा कोण रीती ॥४॥