भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोकुळा येवोनी भेटे नंदादिकां । वैकुंठनायका सांगतसे

gokula yevoni bhete nandadikan | vaikunthanayaka sangatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोकुळा येवोनी भेटे नंदादिकां । वैकुंठनायका सांगतसे ॥१॥ कंसानें मांडिला अधर्म बहुत । मारावें त्वरित तयालागीं ॥२॥ लावोनियां आग आपण विझविली । तेंचि परी केली नारदानें ॥३॥ सांगोनियां ऐसें विणा सांवरोन । निघाला तेथून नामा म्हणे ॥४॥