भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोक्षीर लाविलें अंधळिया मुखीं । तेथील पारखी जिव्हा जाणे

gokshir lavilen andhaliya mukhin | tethil parakhi jivha jane

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोक्षीर लाविलें अंधळिया मुखीं । तेथील पारखी जिव्हा जाणे ॥१॥ तैसे देवा तुझें नाम निरंतर । जिव्हेसी पाझर अमृताचे ॥२॥ सोलूनियां केळें साखरें घोळिलें । अंधारीम खादलें तरी गोड ॥३॥ द्राक्षफळां घड सेवितां चोखड । तयाहूनि गोड नाम तुझें ॥४॥ आळूनियां क्षीर तुपाचिये आळे । कालविलें गुळें गोड जैसें ॥५॥ जाणोनियां नामा करी विनवणी । अमृताची खाणी नाम तुझें ॥६॥