भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोदातीरीं उत्सव करिती जगजेठी । चांगदेवासाठीं समारंभ

godatirin utsav kariti jagajethi | changadevasathin samarambh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोदातीरीं उत्सव करिती जगजेठी । चांगदेवासाठीं समारंभ ॥१॥ निवृत्ति मुक्ताबाई संगें पंढरिनाथ । आले मंडपांत समुदायेंसी ॥२॥ निवृत्ति पांडुरंग बैसले निवाडे । चांगदेव पुढें उभे ठेले ॥३॥ जोडियेले कर चांगदेवें पुढतीं । करिती विनंति वोसंडोनी ॥४॥ नामा म्हणे देवा उठिलें अंतःकरण । नाहीं देहभान चांगयासी ॥५॥