भजनी मालिका
← भजनांकडे परत

गीता गीता गीता त्रिवार बोलतां । पाप जाय तत्त्वतां मोक्ष जोडे

gita gita gita trivar bolatan | pap jay tattvatan moksha jode

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गीता गीता गीता त्रिवार बोलतां । पाप जाय तत्त्वतां मोक्ष जोडे ॥१॥ गीतेचा महिमा बोलवेना वाचे । बंधने जीवाची दूर होती ॥२॥ येक येक अक्षर कोटी अश्वमेध । फळ हें प्रसिद्ध पुराणोक्त ॥३॥ येकचि तो श्लोक वाचिलिया नेमें । अंतीं परमधाम प्राप्त होय ॥४॥ नामा म्हणे गीता संपूर्ण वाचितां । लाभ त्याच्या हाता बोलवेना ॥५॥