भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरधनि याणीं केला गुरु । बाई मी आतां काय करूं

gharadhani yanin kela guru | bai mi atan kay karun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
घरधनि याणीं केला गुरु । बाई मी आतां काय करूं । असोनि नाहींसा संसारू । चमत्कार कृपेचा ॥१॥ धांवे पावे गे मेसाई । येथें कोणाचें न चाले कांहीं । सत्यपण तुझे ठायीं । तरी हें नाहिसें करी गे ॥२॥ मंत्र घेतला जैसा । घरीं संताचा वोळसा । वोस पडो हरिदासा । गेले नमत मागुते ॥३॥ काय सांगों याची रीती । सोसे सोसे पाये चरणाप्रती । अवघे भांबडभूत होती । नाचताती आनंद ॥४॥ लौकिकांत गेलीं वायां । एकाच्या एक पडती पायां । म्हणती ये गा पंढरिराया । ब्रह्मानंदें डुल्लतां ॥५॥ भोळी सासू गोणाबाई । पांढरा स्फटिक व्याली पाही । त्यानें जोडिल शेषशायी । काय राजाई करूं म्हणे ॥६॥