भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरा येतां बाळ देखिलें मातेनें । दाटली दु:खानें बोलवेना

ghara yetan bal dekhilen matenen | datali du:khanen bolavena

रचनाकार: संत नामदेव · अभंग
घरा येतां बाळ देखिलें मातेनें । दाटली दु:खानें बोलवेना ॥१॥ आक्रंदोनि पुढें मोकळोनि धाये । नेणों कैसें काय झालें यासी ॥२॥ घालोनियां कव घेतां कडेवरी । दोन्ही नेत्र करीं पुसीतसे ॥३॥ काय झालें बाळा सांग बा वृत्तांत । बा कोण तूंतें पाहों नेणे ॥४॥ नामा म्हणे असो प्रेमा तो अपार । पुढील विचार बोलीजेला ॥५॥