भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालीतसे वेढे दिसतसे जळीं । आकांत सकळीं मांडियेला

ghalitase vedhe disatase jalin | akant sakalin mandiyela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
घालीतसे वेढे दिसतसे जळीं । आकांत सकळीं मांडियेला ॥१॥ गडी रडताती वत्स पळताती । कपाळ पिटिती सकळीक ॥२॥ तुजवांचोनीयां रक्षी कोण आह्मां । काय सांगूं रामा सकळीक ॥३॥ रुसल्या आमुचें करी समाधान । तुजवीण वन ओस वाटे ॥४॥ आम्हांसाठीं तुवां दुष्टासी मारिलें । कोण आतां लळे पुर-वील ॥५॥ तुजवांचोनियां आह्मी सर्व दीन । न जाऊं येथून गोकु-ळासी ॥६॥ वियोगानें तेव्हां पक्षी रडताती । आतां कृष्णमूर्ती कैंची आह्मां ॥७॥ बोलोनियां ऐसें निस्तेज पडती । नदी वाहत होती स्थीरावली ॥८॥ नामा म्हणे होती दुश्चिन्हें बहुत । गोकुळीं समस्त विचारिती ॥९॥