भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालितसे पंथ तरावया जना । गेले संदीपना घरीं दोघे

ghalitase panth taravaya jana | gele sandipana gharin doghe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
घालितसे पंथ तरावया जना । गेले संदीपना घरीं दोघे ॥१॥ गुरुसेवा करिता वंदिती चरणा । जाहली संपूर्ण विद्या तेव्हां ॥२॥ जोडोनियां हात करिती प्रार्थना । मागावी दक्षणा गुरुराया ॥३॥ नामा ह्मणे द्विज ह्मणत स्त्रियेसी । असे जें मानसीं इच्छा तुझ्या ॥४॥