भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेला परमहंस परिवारासहित । कोल्हाळ करिती मायबहिणी

gela paramahans parivarasahit | kolhal kariti mayabahini

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गेला परमहंस परिवारासहित । कोल्हाळ करिती मायबहिणी ॥१॥ काय हे नगरी पांचही तराळ । निद्नेनें भ्रमले व्याकुळ झाले ॥२॥ गेला मागून दिसे कवणिये वाटे । नवही द्वारें सपाट पडलीं ओस ॥३॥ नामा ह्मणे चोरी एके अंगणांत । दिवसा रात्रीं पडत खाण तेथें ॥४॥