भजनी मालिका
← भजनांकडे परत

गायीवत्सगोपाळ केलीसे निर्मान । न लागतां क्षण परीक्षिती

gayivatsagopal kelise nirman | na lagatan kshan parikshiti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गायीवत्सगोपाळ केलीसे निर्मान । न लागतां क्षण परीक्षिती ॥१॥ पूर्ववत सर्व न्यून कांहीं नाहीं । करीत आपाही मनामाजी ॥२॥ इच्छामात्रें करी ब्रह्मांडाच्या कोटी । त्यासी काय गोष्टी अपूर्व हे ॥३॥ सायंकाळीं गेले गोकुळाभीतरीं । आपुलाल्या परी घरीं सर्व ॥४॥ ब्रह्मादिकां ज्याचा नकळेची पार । मानवा विचार न कळे कांहीं ॥५॥ ऐसा हा समर्थ नामयाचा धनी । वंदी पायवणी सदाशीव ॥६॥