भजनी मालिका
← भजनांकडे परत

गायी घेवोनियां जासी जेव्हां राना । आमुचिया मना दु:ख वाटे

gayi ghevoniyan jasi jevhan rana | amuchiya mana du:kha vate

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गायी घेवोनियां जासी जेव्हां राना । आमुचिया मना दु:ख वाटे ॥१॥ सुकुमार सांवळीं जैसीं रातोत्पळें । त्याहूनि कोंवळे पाय तुझे ॥२॥ खडे कांटे बहू कठिण तृण मुळें । ठेवीसी पाउलें त-यावरी ॥३॥ पावतोसी क्लेश अगा वासुदेवा । म्हणोनियां जीवा दु:ख वाटे ॥४॥ सांगतसों आम्ही नित्य यशोदेसी । धाडूं नको यासी वनामध्यें ॥५॥ नामा म्हणे होय सकळांचा उद्धार । म्हणोनी श्री-धर वना जाय ॥६॥