भजनी मालिका
← भजनांकडे परत

गरुडपाराजवळी नामदेव आला । सन्मुख देखिला पांडुरंग

garudaparajavali namadev ala | sanmukh dekhila pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गरुडपाराजवळी नामदेव आला । सन्मुख देखिला पांडुरंग ॥१॥ मेघःशाममूर्ती डोळस सांवळी । तें ध्यान ह्रदयकमळीं धरोनि ठेला ॥२॥ धन्य नामदेव भक्त शिरोमणि । ज्याचा चक्रपाणि वेळाइतू ॥३॥ पूर्ण सहज स्छिती जाला सुखाचा अनुभव । सकळ देहभाव पारूषले ॥४॥ मन पांगुळलें स्वरूपीं गुंतलें । बोलणें खुंटलें प्रीतिमौन ॥५॥ सबाह्म अभ्यंतरीं स्वरूप कोंदलें । द्वैत निरसलें दृश्याकार ॥६॥ निजरूप निर्धारितां नयन सोज्वळ जाले । रोमांच दाटले खरबरीत ॥७॥ आनंदाचा घन वोळला अंबरीं । वृष्टीस चराचेरीं होत असे ॥८॥ तें क्षीर सेवितां जालें समाधान । चुकलें जन्ममरण कल्पकोटी ॥९॥ सहज सुखें निवाला भवदुःख विसरला । विसावा भेटला पांडुरंग ॥१०॥ नामा म्हणे दृष्टी लागेल पां झणीं । धन्य पुंडलिकाचेनि जोडलें सुख ॥११॥